तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलच्या पदाधिकारी यांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १७ _ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रणित नाट्य, चित्रपट ,साहित्य, कला व सांस्कृतिक सेलच्या बीड जिल्हा सरचिटणीस जेष्ठ नाट्यकलावंत प्रा. राजेंद्र बरकसे यांना महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी परळी येथे नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. 
         राष्ट्रवादी नाटय, चित्रपट, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराष्ट्राच्या तळागाळातील कलावंतांच्या मूलभूत प्रश्नांना सरकार दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी हा सेल सक्रिय झाला असून  मराठवाड्यात या सेलचे विभागीय अध्यक्ष चित्रपट अभिनेते डॉ.सुधीर निकम यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम सुरू केले असून गावपातळीवर पक्षाचे विचार ध्येय धोरणे पोहोचविण्यासाठी, पक्षवाढीसाठी जिल्ह्या जिल्हयात कार्यकारणी निर्माण करण्यात येत आहेत. यावेळी ना. धनंजय मुंडे  यांच्या हस्ते उस्मानाबाद, परभणी, बीड या जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या नियुक्त्या देण्यात आल्या. 
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वृद्ध, अपंग, कलावंत लोककलावंत यांना काही मदत करता येऊ शकते का यावर धनंजय मुंडे यांनी आलेल्या कलावंतांच्या समवेत अभ्यासपूर्वक चर्चा केली. आगामी काळात मराठवाड्यात या सेलच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव, मेळावे, कार्यशाळा, स्पर्धा, चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. कलावंतांच्या आरोग्य, जीवन विमा, रोजगार, रेशन आदी आवश्यक प्रश्न सोडवण्यात येणार आहे. सुधीर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यात जवळपास पाच हजार कलावंतांचे मजबूत संघटन तयार झाले असून, सर्व स्तरातील कलावंतांची कलेनिहाय वर्गवारी करून विविध समस्या सोडवण्यात येणार आहेत.
          यावेळी इतर जिल्हया सोबतच बीड जिल्हयातील अॅड.संतोष वारे- जिल्हा कार्याध्यक्ष, विकास वक्ते -  जिल्हा उपाध्यक्ष, प्रा. राजेंद्र बरकसे -  जिल्हा सरचिटणीस यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ह. भ. प. कोकाटे महाराज , बीड जिल्हा चित्रपट व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष कुमार पुराणिक आदी अनेक मान्यवर उपस्थित असल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांना कळविण्यात आली.

╭════
   सुभाष मुळे_ गेवराई, बीड
पत्रकार _मो. 94 2224 3787_
                                   ════╯

No comments:

Post a comment