तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने न.प.कर्मचारी सत्यवान रोडे यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने नगर परिषदेचे लिपिक सत्यवान प्रकाश रोडे यांचा कोरोनाच्या संकटात उत्कृष्टपणे सेवा बजावल्याबद्दल कोरोना योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 
         बीड जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य, हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष,   भाजपा  युवानेते राजेश हरिश्चंद्र गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल नगर परिषदेचे लिपिक सत्यवान प्रकाश रोडे यांचा कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. हरिसुख प्रतिष्ठानचे अजय गित्ते यांनी नगर परिषदेचे लिपिक सत्यवान प्रकाश रोडे यांना कोरोना योध्दा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
           नगर परिषदेचे लिपिक सत्यवान प्रकाश रोडे यांनी 
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्य करणाऱ्या रोडे यांचा गौरव करण्यात आला.  कोरोनाच्या संकटात सत्यवान रोडे यांनी प्रभाव सुरक्षा समिती कोरोना कोवीड 19 विषाणुजन्य परिस्थितीची माहिती विभाग नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या वेळोवेळी सुचनांचे काटेकोर पालन करत.प्रभाग क्र.11 मध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांना व स्थानिक नागरिक जनजागृती करणे, व्यक्तीची नाव नोंदणी करणे, नोंदणी करून. गरजेनुसार दावाखान्यात घेऊन जाणे, त्यांना होम काँरंटाईन करणे, दररोज त्यांच्यावर घराबाहेर निघु नये म्हणून आवाहन करणे, घरोघरी जाऊन जनजागृतीच्या माध्यमातून माहिती देणे, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा. कराड, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांच्या सुचनांच्या पालन करत प्रभाग क्रमांक 11मध्ये कोरोनाला दूर ठेवल्याबद्दल व कर्मचाऱ्यांच्या भूमिका चांगल्या प्रकारे बजावल्याबद्दल व कोरोना कोविड-19 या संकटांत काम केले त्याबद्दल सत्यवान रोडे यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment