तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा 'सेवा सप्ताह'

गरजूंना मदत, फळ वाटप, रक्तदान, आयुर्वेदिक काढा वाटप आदींसह विविध उपक्रम राबविणार - सतीश मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ ते २० सप्टेंबर दरम्यान परळीत भाजपच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. गरजूंना मदत, रूग्णालयात फळ वाटप, रक्तदान, आयुर्वेदिक काढा वाटप आदींसह विविध उपक्रमांचे आयोजन सप्ताहात करण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी दिली.

   भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहात घेण्यात येणा-या विविध उपक्रमा संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली व तीत सविस्तर रूपरेषा ठरविण्यात आली.

  १७ सप्टेंबर रोजी गरीब वस्त्यांमध्ये आणि रूग्णालयात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून फळ वाटप तसेच आयुर्वेदिक काढा वाटप, १८ रोजी गरीब बंधू भगिनींना आवश्यकतेनुसार चष्मा वाटप, १९ तारखेला अक्षता मंगल कार्यालयात सकाळी १० वा. पासून युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबीर, २० रोजी प्रत्येक बुथमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. शिवाजी चौक, १०.३० वा. राणी लक्ष्मीबाई टाॅवर आणि ११ वा. मा. पंकजाताई मुंडे यांचे कार्यालय येथे पंडित दिनदयाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, बुथ प्रमुखांच्या निवासस्थानावर पक्षाचा ध्वज, वेबिनारच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रम घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

   या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडी कार्यकारणी सदस्य जुगल किशोर  लोहीया, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीहरी मुंडे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख प्रदेश किसान मोर्चा कार्यकारणी सदस्य उत्तम माने  भीमराव मुंडे रमेश कराड तालुका सरचिटणीस रवी कांदे शहर सरचिटणीस उमेश खाडे, राजेंद्र ओझा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अरुण पाठक योगेश पाडकर अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष तानाजी व्हावळे, बाळासाहेब फड शाम गित्ते राम तोष्णीवाल शुरेश सातभाई उपस्थित होते.

No comments:

Post a comment