तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

सिरसाळ्यातील उपोषण कर्त्यांची परिस्थिती खालावली

 
     आरोग्य निरिक्षक डाॅ. राधाकिसन राऊत यांनी केली तपासणी 

  उपोषणाचा चौथा दिवस 

सिरसाळा न्यूज  : येथील गट नंबर ३४३ मधील रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालाया समोर युवक ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरु केले आहे. 
उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरिक्षक डाॅ. राधाकिसन राऊत, औषध अधिकारी संदिप लांडगे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राठोड यांनी उपोषण कर्ते युवक धर्मा मेंडके, मिलिंद चोपडे, केशव बन्सोडे यांची आरोग्य तपासणी केली. पैकी धर्मा मेंडके यांची तब्ब्येत अधिक खावल्याचे समजले, परिस्थिती खालवल्याने उपोषण दवाखान्यात अॅडमिट करुन उपचार करावे लागतील असे त्यांनी सांगितले. एवढी परिस्थिती गंभीर होऊन सुद्धा प्रशासन उपोषण कर्त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. परळी नायब तहसीलदार रुपनर व तलाठी सोळंके यांनी उपोषण उपोषण स्थळी भेट देऊन म्हणाले कि, जिल्हाधिकारी यांना मागणी संदर्भातील अतिक्रमणा बाबत अहवाल पाठवला आहे, या बाबत जिल्हा अधिकारी यांचा आदेश/ अहवाल येई पर्यंत आम्ही काहीही करु शकत नाहीत. तो पर्यंत थांबावे व उपोषण मागे घ्यावे असे रुपनर म्हणाले. पंरतु उपोषण कर्ते युवक आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत. व अमरण उपोषण सुरुच ठेवले आहे. आता उपोषणाचा चौथा दिवस सुरु झाला आहे. उपोषण कर्ते युवकांची आरोग्य परिस्थिती अधिकच खालावण्याची शक्यता आहे. उपोषण कर्त्या युवकांच्या जिवाचे जर काही बरे वाईट झाले तर याला तहसील प्रशासन, ग्रामपंचायत सिरसाळा जबाबदार असेल. म्हणून परिस्थिती अधिक गंभीर होण्या पुर्वी संबंधित प्रशासनाने दखल घेऊन, मागणी पुर्ण करणे गरजेचे आहे.

  ● जिवाचं बरं वाईट तर प्रशासन जबाबदार असेल  : - कोरोनाची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत अमरण उपोषण दिर्घ काळ राहिले आणि उपोषण कर्त्यांना कोरोनाची लागण झाली तर जिवाचे बरे वाईट होऊ शकते आणि याला जबाबदार संबंधित प्रशासन असेल, मा.जिल्हा अधिकारी यांनी दखल घ्यायला हवी अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थ करत आहेत.

No comments:

Post a comment