तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

प्रा. डॉ.गोविंद वाकणकर यांचा सत्कार संपन्न


 सोनपेठ : येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयातील क्रीडा संचालक  प्रा. गोविंद वाकणकर यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी.  पदवी प्रदान केली. त्यांनी मिळवलेल्या या पदवी बद्दल त्यांचा हशिप्रमं चे अध्यक्ष परमेश्वरराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, याप्रसंगी प्राचार्य डॉ वसंत सातपुते, आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. गोविंद वाकणकर यांना 'खेळाडूंच्या क्रीडा संपादणूकीवर पालकांच्या आर्थिक, सामाजिक व निवास परिसराचा होणारा परिणाम : एक अभ्यास' या विषयावर प्रा. डॉ. माधव शेजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण करून आपला संशोधन प्रबंध सादर केला होता, नुकतीच कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने  मौखिकी परीक्षा घेऊन ही पदवी प्रदान केली.
 प्रा. डॉ. गोविंद वाकणकर यांच्या या  यशाबद्दल हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे  अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते ,  डॉ. वैजंता पाटील , डॉ. बाविस्कर  , प्रा डॉ. पी. एन. देशमुख , प्रा डॉ. डी.बी. रोडे , महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी व तसेच सर्व मित्र परिवार आदींनी अभिनंदन केले व सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a comment