तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

परळी शहराची पाणीपुरवठा योजना लवकरच पुर्णस्वरुपात-भावड्या कराड

परळी (प्रतिनिधी)
 परळी शहराला पाणीपुरवठा करणार्या नागापुर येथील वाण प्रकल्पात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असुन परळी शहराला पाणीपुरवठा करणारी नविन पाणीपुरवठा योजना पुर्णस्वरुपात येत असुन लवकरच ना.धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते भाऊसासाहेब कराड यांनी सांगितले.
 मागील दोन वर्षांपासुन परळी  शहराच्या वाढीव भागाची गरज लक्षात घेवुन न.प.पाणीपुरवठा सभापती सौ.प्राजक्ता कराड यांनी शहरातील बहुतांश भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. युवानेते भाऊसासाहेब कराड यांनी पाणीप्रश्नावर शासन दरबारी पाठपुरावा करत नविन पाणी पुरवठा योजनेस गती मिळवुन दिली.परळी शहराला पाणीपुरवठा करणार्या नागापुर येथील वाण प्रकल्पात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असुन एक-दोन मोठ्या पावसात  हा प्रकल्प ओसंडुन वाहणार आहे.यामुळे परळीकरांनी पाण्याची चिंता करु नये असे आवाहन युवानेते भाऊसासाहेब कराड यांनी केले आहे.

No comments:

Post a comment