तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

विविध प्रलंबीत मांगण्या त्वरित पुर्ण करा अन्यथा आंदोलन

 विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनचा इशारा  
संग्रामपुर [ प्रतिनिधी] शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्यांची पूर्तता करुन अंमलबजावणी करण्या संदर्भात.शिक्षणमंत्र्या समवेत संघटना पदाधिकारी यांची झालेली बैठक वेळी दिलेल्या आश्वसनाची पुर्तता न झाल्याने आत्मक्लेश आंदोलन  विज्युक्टाचे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आत्मक्लेश आंदोलन सह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केल्यानंतर प्रलंबीत मांगण्या  निकाली काढण्याचे आश्वासन मा.मंत्र्यांनी दिलेले होते मात्र आजहि विविध मांगण्या प्रलंबीत असल्याने विविध प्रलंबीत मांगण्या त्वरित पुर्ण करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री , शिक्षण मंत्री यांना विज्युक्टाने दिला आहे  दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि मूल्यांकन पात्र घोषित उ.मा.शाळा , वाढीव तुकड्या तथा अघोषितला निधीसह घोषित करुन सर्वांचा निधी वितरणाचा आदेश त्वरीत निर्गमित करावा .1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर नियुक्त शिक्षकांवर जून्या पेन्शन बाबत झालेला अन्याय त्वरीत दूर करावा तसेच नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी 20 वर्षापासून विनावेतन कार्यरत आयटी शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे .दशकाहून अधिक काळ विनावेतन वाढीव पदावर कार्यरत शिक्षकांना पदमंजूरी व वेतन अनुदान द्यावे  राज्य सरकारी कर्मचारी यांचे प्रमाणे 10,20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी . यासह चर्चा झालेल्या मागण्यां संदर्भात त्वरीत आदेश काढावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला  यावेळी प्रा डॉ अशोक भुते, प्रा दिलीप धामोळे, प्रा एस आर काळे, प्रा संतोष ढगे , मोहन रौदळे , प्रा निलेश भोंडे, प्रा बि आर इंगळे , प्रा मोहम्मद नासिर , प्रा प्रसेन्नजीत वानखडे प्रा असलम खान , प्रा कल्पना राऊत, सहदेव सोळंके सह आदी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थीत होते

No comments:

Post a comment