तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 September 2020

राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या


राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नुकतेच देहावसन झाले. आपली पूर्ण हयात राष्ट्रवाद, धर्माचरण आणि समाज सुधारणेसाठी डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी संमर्पीत केली होती. लिंगायत समाजातील अनुयायांसह ईतर सर्व समाजासाठी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरलेले आहे. अध्यात्मातून राष्ट्रधर्म आणि नागरीक यांची नाळ त्यांनी जोडली आहे. वृक्ष जोपासणा, सामाजिक व वैचारीक वातावरण सदृढ व्हावे याचे धडे आपल्या प्रवचनातून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिलेले आहे. या सर्व गोष्टींची दखल घेवून महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे.
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे एकूण जीवन समाज सुधारणेसाठीचा मोठा पाया होता. राज्य आणि देशभरात त्यांनी आपल्या अध्यात्मिक श्रावणमास व अन्य तपोनुष्ठान कार्यक्रमातून एकसंध समाजासाठी मार्गदर्शन केले आहे. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे सर्व समाजासाठी दिशादर्शक असुन, त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी शिफारस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपण करावी. यासाठीची आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून केंद्र सरकारला विनंती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a comment