तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

खासदार डाॅ. श्री.सुजयदादा विखे पाटील यांची भेट घेऊन सरूनाथ पाटील उंबरकर यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या

       आज दि.9/9/2020 सकाळी जनसेवा कार्यालयात खासदार डाॅ.सुजयदादा विखे पाटील यांची भेट घेऊन  श्री.सरूनाथ पाटील उंबरकर (माजी.सदस्य -पंचायत समिती संगमनेर.)
आश्वि परिसरातील शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले असल्याचे व  प्रचंड पाऊस झाल्याने पाण्याने जमीनी ऊपाळल्या असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत तसेच चींचपूर,निमगावजाळी. प्रतापपूर , आश्वी , उंबरी , बाळापूर , ओझर , रहिमपूर , मनोली , कोल्हेवाडी , आश्वी खुर्द, दाढ खुर्द, चणेगाव , झरेकाठी , शिबलापूर , माळेवाडी , शेडगाव , ओझर बु, कनकापूर , कनोली या गावातील पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे *पीकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत* तसेच या गावातील जमीनी पावसाळ्यात दरवर्षी पानथळ होऊन नापीक होतात आणि जमिनीत सुपीकता राहत नाही. त्यामुळे दोन पीकांचे नुकसान दरवर्षी होत आहे. त्यामुळे मा.खासदार डाॅ.सुजयदादा.  यांनी या भागातील गावांतील पानथळ जमीनीचे सर्वेक्षण करून पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे वतीने शासकीय योजना राबवून या जमिनी मधून शेतकऱ्यांची संमती व सहकार्य घेऊन सहा फूट ते दहा फूट रूंदीचे चर घेऊन या जमिनीतील पावसाचे पाणी प्रवरा नदीमध्ये सोडण्यात यावे  अशी मागणी केली आहे.

    तसेच भविष्यात ह्या जमीनी मध्ये  पावसाळ्यात साचलेल्या पावसाचे पाणयाने खारवट पणा वाढून जमीनीचा पोत खराब होऊ शकतो आणि पून्हा या जमिनीवर मशागत करून शेणखत अथवा हिरवळीचे खत टाकूण आता तरी या परिस्थितीत शक्य नाही कारण गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना साथीचे आजाराने शेतकरी वर्ग त्रस्थ झालेला आहे. त्यामुळे आता शेतकरी वाचला तरच आपल्या शिर्डी मतदारसंघात  आश्वी परिसरातील सव्वीस गावे सुजलाम सुफलाम राहतील त्यामुळे शिवार रस्ते पावसाने  खराब झाले आहे त्याबाबतीत मुरूम टाकणे बाबद ही लक्ष घालण्याची विनंती सरूनाथ उंबरकर यांनी केली आहे. त्यावर खा.डाॅ.सुजयदादा विखे पाटील यांनी सांगितले की लवकरच शासकीय महसुल अधिकारी आणि जलसिंचन विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन शेतकर्‍यांच्या पानथळ जमीनीचे  बाबतीत आणि होणारे पीक नुकसान भविष्यात कसे थांबवता येईल याबाबत उपाययोजना करू असे आश्वासन दिले आहे.....

No comments:

Post a comment