तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

हिंगोली जिल्ह्यातील वयोवृद्ध लोकांच्या अडचणी दूर करा परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी


हिंगोली प्रतिनिधी 

परमेश्वर इंगोले पाटील प्रदेश सचिव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कॉग्रेस महाराष्ट्र राज्य यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे केली मागणी 

प्रति ,  श्रीमती वर्षाताई गायकवाड  पालकमंत्री हिंगोली      विषय :- हिंगोली जिल्ह्यातील वयोवृद्ध लोकांच्या अडचणी कडे लक्ष देण्यासंदर्भात .....           महोदया ,वरील विषयानुसार आपणास अवगत करू  इच्छितो   केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा  निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन  योजनेत #हिंगोली जिल्ह्यातील  सेनगाव तालुक्यातील अनेक  लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत  पात्र लाभार्त्याचे अर्ज नामंजूर करणे, नामंजूर झालेल्या प्रकरणात लाभार्त्यांना त्रुटी न सांगणे, प्रकरण मजूर नामंजुरबाबत अर्जदाराशी कुठलाही पत्र व्यवहार न करणे अशा अनेक तक्रारीं योजनेत     तहसील कार्यालयात दिसून येतात  सामाजिक न्याय विभागाच्या योजना संदर्भात अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना @VarshaEGaikwad ताई आपण  सक्त ताकीद देऊन विभागाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले पाहिजे यापुढे कुठल्याही प्रकरणात अर्जदारांना त्रास झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस  मार्फत कठोर कार्यवाही करण्यात येईल ...


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment