तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

भूमी अभिलेख कार्यालयाच्या सेवा ऑनलाईन


बीड, 09 (जिमाका) 
प्रदिप कोकडवार संकलित वृत्त:-भूमी अभिलेख कार्यालयाच्या सेवा ऑनलाईन करण्यातआल्या असून  लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत अधिसूचित  २० आहेत. सेवा महाऑनलाईन प्रणालीवर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 9 मधील तरतुदीनुसार माहिती प्राप्त करण्याविषयी प्रथम अपिलाच्या निर्णय 30 दिवसात व व्दित्तीय अपिलावर निर्णय 45 दिवसाच्या आत देणे बंधकारक आहे.विविध सेवा व ते मिळणे विषयी शासनाकडून निर्धारित दिवस यांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

नक्कल पुरविणे,
(01).मिळकत पत्रिका : 3दिवस,(02).मिळकत पत्रिका मुंबई उपनगर जिल्हा पडताळणी :30दिवस,
(03).टिपण क्षेत्रबुक प्रति बुक शेतपुस्तक,जवाब,काटे, फाळणी ,ही फ्रॉ.नं 4. आकार फोड, स्कीम उतारा आकारबंद गट नकाशा मोजणी नकाशा चौकशी नोंदवही इत्यादी अभिलेख 5.दिवस (04) अपील निर्णयाचा नकला : 3 दिवस

 मोजणी प्रकरणे 
(05) अति अति तातडीची प्रकरणे : 15 दिवस 
(06) अति तातडी प्रकरणात : 60 दिवस
(07) तातडी प्रकरणे : 90 दिवस
(08) साधी प्रकरणे : 180 दिवस
(09) पोट हिस्सा मोजणी नंतर परिपूर्ण प्रकरणामध्ये आकारफोड मंजूर करणे : 30 दिवस
(आकार फोड /क.जा.प.तयार करणे)
(10) पोट हिस्सा मोजणी नंतर परिपूर्ण प्रकरणामध्ये आकारफोड मंजुर करणे : 30 दिवस
(11) बिनशेती मोजणी प्रकरण निकाली झाल्यानंतर परिपूर्ण प्रकरणांमध्ये क जा प तयार करून मंजुर करणे : 30 दिवस

 फेरफार नोंदी 
(12) विवाग्रस्त नसल्यास 25 दिवस दुवा तुटलेली आल्यास फेरफार बाबत निर्णय घेणे : 90 दिवस
(13) रस्ता,रस्ता सेट,बँक,रिझर्वेशन याबाबत संबधित प्राधिकरणाला जागा हस्तांतरित केलेल्या प्रकरणी संबंधीच्या नावे मिळकत पत्रिकेत नोंद घेणे ( प्रकरणी महानगरपालिका / सक्षम अधिकारी यांनी ताबा पावती व संपूर्ण कागद पत्रासह नामांतरासाठी प्रकरणे पाठविल्यास ) : 30 दिवस
(14) विवादग्रस्त असल्यास  : 1 वर्षे 
(15) मिळकत पत्रिकेच्या पोट विभागणी करून मिळकत पत्रिका स्वतंत्र करणे याबाबत पोटहिस्सा मोजणी पूर्ण झालेल्या दिवसापासून
(16)जिल्हाधिकारी यांनी आदेश केलेल्या क्षेत्रात तफावत येत नसल्यास पोटहिस्सा मोजणी मोजणी झाल्यापासून स्वंतत्र मिळकत पत्रिका तयार करणे : 30 दिवस
(17) जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेल्या पोटहिस्सा क्षेत्रात तफावत येत आहे मात्र मूळ नगर भूमापनच्या फरक नाही अशा प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी फेरमान्यता दिल्यांनतर स्वतंत्र मी.पत्रिका उघडणे : 15 दिवस
(18) भूसंपादन मध्ये रस्ता,रस्ता सेट बँक, रिझर्वेशन याबाबत शासन/संबंधित प्राधिकारी यांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे : 30 दिवस
(अ) ज्या ठिकाणी मूळ नगर भूमापनच्या क्षेत्रात फरक पडत नाही अशा बाबतीत सक्षम प्रधिकारी याचा अंतिम आदेश झाल्यानंतर मिळकत पत्रिका स्वतंत्र तयार करणे : 30 दिवस
(19) हस्तांतरण क्षेत्रात फरक पडत असल्यास सक्षम प्राधिका यांच्या फेरअंतिम आदेशानंतर : 30 दिवस 
(20) दुरस्तीसह अदयावत नकाशा तयार करनेबाबत ( पोटहिस्सा सामीलीकरण भूसंपादन रस्ता सेट बँक इत्यादीमूळे नकाशात होणारा बदल ) सक्षम प्रधिकाऱ्यांने मंजूरीचे अंतिम आदेश दिल्यानंतर : 30 दिवस

शासन प्रपत्रानूसार महाऑनलाईन सेवा पुरवण्यात येत असून सदर सेवा जनतेस  पूर्ण ऑनलाईन पध्दतीने आपले सरकार सेवा केंद्र मार्फत अर्ज स्वीकारून देण्यात येत आहे,असे सुदाम जाधव, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,बीड यांच्या कडून कळविण्यात आले.
*-*-*-*-*

No comments:

Post a comment