तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

भाजपायुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांची सिरसाळा येथे अँटीजन चाचणी केंद्राला भेट


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाची अँटीजन तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन आज सिरसाळा येथे नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात
आली या चाचणी सेंटरला भाजपायुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी भेट देवुन
पाहणी केली.
तालुक्यातील मोठी जनसंख्या असलेल्या गावात आरोग्य विभागाने कोरोनाची अँटीजन तपासणी मोहीम सुरू केली आहे त्यानुसार आज मोठी बाजारपेठ 
 व जास्त लोकसंख्या असलेल्या सिरसाळा येथील नागरिकांची अँटीजन चाचणी न्यु हायस्कुल सिरसाळा येथे करण्यात आली.या कोरोना अँटीजन चाचणीसेटंरलालोकनेत्यां मा.पंकजाताई  मुंडे यांच्या आदेशानुसार व जिल्ह्याच्या   खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी भेट दिली व रुग्णांच्या अडचणींची चौकशी केली  तसेच आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली.या वेळी त्यांच्या बरोबर तालुक्यातील भाजपायुमोचे असंख्य  कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a comment