तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 September 2020

हनुमान वाटिकेतील नागरिक सोसत आहेत मरण यातना

नागरिकांनी तेल्हारा पालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
तेल्हारा :   कोरोनाच्या महामारीत नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न, पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा, खराब रस्त्यांमुळे शहरातील हनुमान वाटिकेतील नागरिकांचे होणारे हाल... असे मूलभूत प्रश्न प्रश्न घेऊन स्थानिक नागरिकांनी तेल्हारा नगर पालिकेला घेराव घालून पदाधिकारी व अधिकाऱ्यांना धारेवर धरून सुविधा पुरविण्या संदर्भात मागणी केली .
       तेल्हारा शहरातील मुख्य वस्तीतील हनुमान वाटिके मधील नागरिकांचे हाल होत आहेत. हनुमान वाटिकेतील मुख्य रस्ता पावसाळ्यात पूर्णतः चिखलमय होऊन नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.  या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. या भागामध्ये नवीन पाईप लाईनचे अर्धवट काम असून बहुतेक घरांसमोरून ही लाइन गेली आहे. तसेच जुनी पाईप लाईन जागोजागी तुटलेली असून त्यामुळे डासांचा प्रार्दूभाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील एक वर्षापासून 'पालिके'चे कर्मचारी या भागात फिरकले नसल्यामुळे दिवसेंदिवस परिसरातील परिस्थिती बिकट होत चालली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 'पालिकेला'ला यासंदर्भात अनेक निवेदन देऊन कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. परिणामी या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच पाईप लाईन लिकेज असल्याने गटारातील पाणी पाईप लाईन मध्ये  शिरत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका असून यावर पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
:::;;;;:::::::;;;;;::::::::::::::::::::::::::::::::::::::: 
रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी 

वाटिकेतील मुख्य रस्त्यांसह इतर रस्त्यांची पावसाळ्यात बिकट अवस्था झाली असून त्यामुळे नागरिकांना मणक्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच नवीन पाइप्लाइन लवकरात लवकर सुरु करावी व  घंटागाडी वेळेवर प्रभागात येते का, या गोष्टींवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने कचराकुंड्यांचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. 
– नंदकिशोर नासने, नागरिक
::::;;;;;;;;;;;:;;-----------

No comments:

Post a comment