तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

माजी पोलीस पाटील धर्मराज सुलाखे यांचे निधन

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १५ _ तालुक्यातील रसुलाबाद गावचे माजी पोलीस पाटील श्री. धर्मराज सुलाखे यांचे रविवार, दि.१३ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्ष होते.
       धर्मराज सुलाखे (अण्णा) यांनी रसुलबाद, चकलांबा या गावचे पोलीस पाटील म्हणून ४० वर्ष काम केले होते. त्यांचा चकलांबा गाव व पंचक्रोशीत ज्योतिषशास्त्र विषयात  फार अभ्यास होता. त्यांचा सामाजिक, धार्मिक, नाट्यक्षेत्र, संगीत क्षेत्र यात खुप मोठा जनसंपर्क होता अशी माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी कळवली. 
               त्यांच्या पश्चात पत्नी , ४ मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अरविंद, धनंजय, डॉ. विजय व उदय सुलाखे यांचे ते वडील होते. चकलांबा येथे वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने चकलांबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment