तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

शॉटसर्कीटने शेतक-याचा पाच एक्कर ऊस जळून खाक

प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील देवनांद्रा येथील शेतक-याचा पाच एक्कर उस विजेच्या शॉटसर्कीटने बुधवारी ९ सप्टेबर रोजी दुपारी एक च्या सुमारास जळून शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली.
देवनांद्रा येथील शेतकरी आश्रोबा बाबूराव धोतरे यांचा गट क्रमांक ५१ मध्ये पाच एक्कर ऊस होता या ठिकाणी पाण्या साठी बोअर असून बुधवारी दुपारच्या सुमारास शॉटसर्कीट झाल्याने उसाने पेट घेतला. या वेळी ग्रामस्थ आणि पाथरी न प च्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणण्या साठी अटीतटीचे प्रयत्न केले मात्र हा ऊस संपुर्ण पणे आगिच्या भक्षस्थानी आल्याने शेतक-याचे लाखोंचे उत्पन्न वाया गेले. या शेतक-याला पंचनामा करून नुकसन भरपाई मिळावी अशी मागणी  प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

No comments:

Post a comment