तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे विचार मानवजातीसाठी दिशादर्शक : सुभाष मोहकरे


राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना वीरशैव लिंगायत समाजातर्फे सेलू येथे आदरांजली

सेलू दि.२ (प्रतिनिधी ) : 
राष्ट्रसंत, वसुंधरारत्न
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना सेलू ( जि.परभणी ) येथील वीरशैव लिंगायत समाजातर्फे बुधवारी ( २ सप्टेंबर ) आदरांजली अर्पण करण्यात आली. 
यावेळी नगरसेवक विनोद तरटे, राजेंद्रअप्पा महाजन, अशोकअप्पा वाडकर, महादेवअप्पा आगजळ, सुभाष मोहकरे , निजलिंगअप्पा तरवडगे, शिवकुमारअप्पा नावडे, शुभम सोळंके, श्याम राऊत, शुभम नावघरे आदी उपस्थित होते.

डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज ( वय १०४ ) यांनी नांदेड येथे  अखेरचा श्वास घेतला. अहमदपूर येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे लिंगायत समाजात महाराष्ट्रासह कर्नाटक व अन्य राज्यात मोठा शिष्य, भक्त परिवार आहे. 
स्वातंत्र्य पूर्व काळापासून त्यांनी समाज व लोकप्रबोधनात कार्यरत राहात लोककल्याणार्थ हितोपदेश केलेला आहे. त्यांचे कार्य लिंगायत समाजापुरतेच सिमित नव्हते, तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा  त्यांनी ध्यास घेतलेला होता.
सेलू येथेही अनेक वेळा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी  उपस्थित राहून शिष्य,भक्तांना मानवजातीच्या कल्याणासाठीचा हितोपदेश केलेला आहे. 

संपूर्ण मानवजातीकरिता दिशादर्शक 

" राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे या शतकातील परमेश्वराची एकमेवाद्वितीय निर्मिती होते. त्यांचे उच्च कोटीचे विचार केवळ लिंगायत समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवी समाजाच्या प्रगती व उद्धारा करिता दिशादर्शक होते. हे विचार प्रत्येक समाज बांधवांनी प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे आहे." अशा शब्दांत सुभाष मोहकरे यांनी महाराजांना आदरांजली अर्पण केली.

फोटो ओळी : सेलू ( जि.परभणी ) येथील लिंगायत समाजातर्फे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

पूर्ण.

No comments:

Post a comment