तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी उत्तमराव माने यांची निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी ज्येष्ठ शेतकरी नेते उत्तमराव माने यांची निवड करण्यात आली आहे .
आपल्या आक्रमक आंदोलनातून हजारो शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देत शेतकरी राजाच्या मनावर आपली एक वेगळी छाप पाडणारे सामाजिक राजकीय औद्योगिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून शेतकऱ्यासाठी  संघर्षाचे मशाल पेटवून त्यांनी हक्कासाठी दिवस रात्र एक करत हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे वयाच्या तेराव्या वर्षापासून विद्यार्थी चळवळी च्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना  त्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहेत. त्यांनी विद्यार्थी, युवक असतील शेतकरी असेल कामगार असेल महिला दिन दलितांचे प्रश्न आक्रमक पणे प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मुद्दा असेल , पीक कर्जा मुद्दा असेल, अशा अनेक मुद्यांवर त्यांनी बीड जिल्हा मध्ये अनेक आंदोलन करत वेळ प्रसंगी जेल मध्ये गेले, अनेक केसेस आपल्या अंगावर घेऊन शेतकरी राजाला न्याय मिळून दिला आहे.
अशा संघर्ष नेतृत्वा ची निवड करून भारतीय जनता पार्टी किसान आघाडीने शेतकरी आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक राजकीय शैक्षणिक व सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a comment