तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला नागरिकांची पसंती


अमरशक्ती क्रिडा मंडळ, दादर यांचा स्तुत्य उपक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): २०२० हे वर्ष संपूर्ण जगालाच कोरोनाच्या संसर्गामुळे त्रासदायक ठरले आहे. भारतही ह्यातून सुटला नाही. पण केंद्र शासन, राज्य शासन, आरोग्य यंत्रणा, पोलिसदल, सुरक्षा यंत्रणा, स्वच्छता यंत्रणा तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्यामुळे आपण ह्या महामारीशी यशस्वीपणे झुंज देत आहोत. गणपतीचा उत्सव यंदा पारंपारिक पद्धतीने साजरा होताना दिसत होता. मागच्या साधारण सहा महिन्यांत संपूर्ण जगभरात लॉकडाऊनमुळे पर्यावरणात खूपच चांगला परिणाम जाणवत आहे. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाचा विचार करून अमरशक्ती क्रिडा मंडळ, दादर यांनी बांधलेल्या कृत्रिम तलावात अनंतचतुर्दशी पर्यंत बाप्पाचं विसर्जन करून विभागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी कृत्रिम तलावात बाप्पाचं विसर्जन करणाऱ्या कुटुंबाना भेटवस्तूही देण्यात आल्या. मंडळाने हा तलाव गणेशोत्सवच्या काळात विसर्जनासाठी नागरिकांना उपलब्ध करून दिला होता. सर्वत्र मंडळाच्या ह्या कार्याचं कौतुक होत आहे.

No comments:

Post a comment