तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

पसत्तीस फुट खोल आडात पडलेल्या गोमातेचे बाजीराव धर्माधिकारी यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
 शहरातील झुरळे गोपीनाथ गल्लीतील एका 35 फुट खोल आडात आज बुधवार दि.2 रोजी गाय पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.ही बाब माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांना समजताच त्यांनी न.प.ची यंत्रणा हलवून व स्वतः प्रयत्न करुन त्या गोमातेस आडाबाहेर काढत प्राण वाचविले.
      परळी शहरातील  झुरूळेगोपीनाथ गल्ली मध्ये अनिल बडवे यांच्या जागेतील कठडे नसलेल्या आडात आज बुधवारी सकाळी लाल रंगाची गाय पडल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले ही घटना या प्रभागाचे नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी यांना कळविताच त्यांनी परळी न.प.च्या पाणीपुरवठा व अग्निशामक विभागास सुचना देवुन आपण स्वतः घटनास्थळी येत आडात पडलेल्या  गोमातेचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले.यावेळी अग्निशमन विभागाचे सुनील आदोडे यांची पाणी पुरवठा विभागाचे नसरथभाई  परिसरातील नागरीक शरद कावरे, सचिन स्वामी,रामेश्रर फडकरी ,केशव बडवे, रोहित कुलकर्णी, ऋशिकेष कुलकर्णी,बाबा सरवदे आदींनी अथक परिश्रम घेत सदरील गोमातेला आडाबाहेर काढुन जीवदान दिले.

No comments:

Post a comment