तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 September 2020

पोलीस अधीक्षक मा.संदिप पाटील यांची बदली मनाला हुरहूर लावणारी - नामदेव भोसले


(पुणे प्रतिनिधी)
 गेल्या अडीच वर्षात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदिप पाटील यांच्या काळात गरीबांना प्रथमतेने न्याय मिळाला.  त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आणि दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन गरिबांवर होणारे अन्यायकारक प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अनेक गोरगरीब गरजू कुटुंबांना न्याय मिळाला. तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. संदिप  पाटील यांनी येवढेच कामं केले नाही, तर त्यांच्या हाताखालच्या पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वत: जातीने लक्ष घालून चौकशी केली.  तसेच सर्व पोलीस कर्मचारी वर्गाला कोरोनाच्या महामारी पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळुन तब्येतीची काळजी कशी घ्यावी , यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाच्या महामारी पार्श्वभूमीवर लाॅकडाॅनच्या काळात ते स्वत: काम करीत होते.त्यांनी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कर्तव्य  बजावित असताना पुणे  जिल्ह्यातील जनतेची संपूर्ण काळजी घेतली. त्याचबरोबर निवडणूक , जत्रा , सर्व धर्मियांचे   वेगवेगळे सण यावेळीही त्यांनी जबाबदारी घेऊन केलेल्या कडक बंदोबस्त , व मदत कार्याची पुणे जिल्ह्यातील समाधानी जनतेने प्रशंसा केली मा.संदिप पाटील यांचा कार्यकाळ गोरं गरिबांच्यासाठी चांगला गेला, म्हणुनच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा.संदिप पाटील व पुणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा यांच्या कष्टामुळे पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच गरीबांना  न्याय मिळवून देण्यासाठीही पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. पोलीस अधीक्षक मा.संदिप पाटील यांच्या बदलीमुळे सर्व गरीब जनता नाराज झाली आहे. प्रत्येकाच्या मनात एकच दुःखाची हुरहूर लागली आहे. पोलीस अधीक्षक मा. संदिप पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा! असे मनोगत शेवराई संस्थेचे अध्यक्ष नामदेव भोसले यांनी व्यक्त केले.   पुणे जिल्ह्यातील पारधी समाजातील बांधवांच्या शेवराई सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष,आदिवासी समाजसेवक, आणि साहित्यिक नामदेव भोसले यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक मा.संदिप पाटील यांना जगदगुरु संत तुकाराम महाराजांची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दतात्रय दराडे, पोलीस काॅस्टेंबल शर्मा , पवार , स्वप्रित भोसले, संतोष भोसले,  रोहित भोसले, कुणाल भोसले, बलवर पवार, सुनिल काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a comment