तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

अभिनेत्री कंगना राणावत यांच्या वक्तव्याचा जोडे मारो अंदोलनाने येवला शिवसेनेतर्फे निषेध.......

प्रतिनिधी.संतोष बटाव येवला

मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी तसेच मुंबई ची तुलना थेट पाकव्यक्त काश्मिर शी करणारी बाॅलीवुड अभिनेत्री कंगणा राणावत हिचा निषेध येवला शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालय शनी पटांगण येथे कंगना राणावतच्या फोटो बॅनरला जोडे मारो अंदोलनाने करण्यात आले.कंगणाच वक्तव्य म्हणजे मुंबई सह अखंड संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातील हुतात्म्यांचा अवमान आहे .26/11 च्या हल्यात शहिद झालेल्या पोलीस कर्मचारी  हुतात्म्यांचा तर अपमान आहेच .परंतु कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत जनतेसाठी रात्रं दिवस रस्त्यावर राहुन 50 च्या आसपास पोलीसांचा मुत्यु झाला .त्या पोलीसांचा हि हा अवमान असुन कंगना राणावत यांनी मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्राची माफि मागावी अशी मागणी येवला शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संभाजीराजे पवार,तालुका प्रमुख रतन बोरणारे,भास्कर कोंढरे,येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड ,शिवसेना नगरसेविका तथा महिला आघाडीच्या अध्यक्ष सरोजनीताई वखारे,येवला नगरपालिकेचे शिवसेना गटनेते झामभाऊ जावळे,किशोर सोनवणे,शहर संघटक राहुल लोणारी,चंद्रमोहन मोरे,धिरज जावळे आदि उपस्थित होते

No comments:

Post a comment