तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

शिक्षक_दिनानिमित्त_सेनगाव_येथे_भव्य_सायकलिंग_रॅलीचे_आयोजनहिंगोली प्रतिनिधी 

आज दिनांक 5 सप्टेंबर 2020, शिक्षक दिनानिमित्त, आप्पास्वामी_सायकलिंग_ग्रुप, सेनगाव व  Triathlon_क्लब_नाशिक द्वारे 20 किलोमीटर सायकलिंग रॅली चे आयोजन केले होते आणि शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून श्री व्ही.डी. देशमुख सर आणि श्री मा. शी. कोटकर सर, तसेच उपस्थित सर्व शिक्षक बांधव यांचा सत्कार आयोजित केला होता, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. 👍
    कार्यक्रमाची सुरुवात ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन कृष्णाजी पायघन यांनी केले तर उपस्थित मान्यवर मा.श्री व्ही. डी. देशमुख सर यांचा सत्कार श्री गजानन भाऊराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला तर मा. श्री मा.शी. कोटकर सर यांचा सत्कार श्री पी. आय. सरदार सिंग ठाकूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच उपस्थित  शिक्षक श्री एम.आर.गडदे, एम.आर.डूकरे, प्रभाकर डांगे, अनिल मस्के ,संगेपवाड सर यांचाही  सत्कार आप्पास्वामी सायकलिंग ग्रुप सेनगाव च्या सर्व सदस्यांच्या वतीने हार घालून व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला, तसेच उपस्थित मान्यवर श्री मा. शी. कोटकर सर आणि श्री व्ही. डी.देशमुख सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आभार श्री सरदार सिंग ठाकूर साहेब यांनी केले.
     सायकलींगच्या रॅलीमध्ये श्री सरदारसिंग ठाकूर साहेब, श्री गजानन भाऊराव देशमुख, श्री संतोष भाले, श्री पोले सर, श्री मस्के सर, डॉ. गजानन पायघन, श्री सरकटे सर, श्री संतोष आप्पा, प्रणव शिंदे यांनी सहभाग घेतला.  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री दास येवले (उडपी रेस्टॉरंट,सेनगाव) यांनी सहकार्य केले.

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो नंबर 8007689280

No comments:

Post a comment