तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार सुरळीत करा अन्यथा टाळे ठोकणार;शिवसेनेचा निवेदनाव्दारे इशारा


प्रतिनिधी
पाथरी:-येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेली चारपाच दिवसा पासून दैनंदिन व्यवहार विविध कारणे देत खोळंबली जात असल्याने ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून बँकेने कारभार सुधारुन नागरीकांची कामे वेळेत पार पाडावी अन्यथा पंधरा सप्टेबर रोजी बँकेला टाळे ठोकून धरने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी निवेदनाव्दारे गुरूवार १० सप्टेबर रोजी बँक व्यवस्थापकांना दिला आहे.

या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली चारपाच दिवसा पासून नेट चालत नसल्याचे कारण देत शेतकरी आणि इतर सामान्यांची कामे खोळंबली आहेत. शाखेच्या बाहेर सतत इंटरनेट बंद असल्याचा बोर्ड लावला जात आहे. कर्मचारी यांना विचारना केल्यास बँटरी बँकप नाही,इनव्हर्टर खराब झाले,लाईट गेली की इनव्हर्टर चालत नाही,व्यवहार सुरळीत होत नाहीत तो पर्यंत थांबा अशी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.शिवाय बँकेत तीनच कर्मचारी कार्यरत आहे. आगोदरच शेतकरी आस्मानी सुलतानी संकटांचा सामना करत आहे. येत्या चौदा सप्टेबर पर्यंत बँकेत इव्हरर्टर सह पुरेसे कर्मचारी ठेऊन बँक व्यवहार सुरळीत करावे अन्यथा पंधरा सप्टेबर रोजी बँकेला टाळे ठोकून धरने आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने निवेदना व्दारे बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांना दिला आहे या वेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे, उप तालुका प्रमुख हरीभाऊ वाकनकर, बाळासाहेब आरबाड,आव्हाड, रामचंद्र आमले यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment