तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

इंटकचे प्रदेश सचिव बळीराम गित्ते यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य मजदूर काँग्रेस इंटक संघटनेचे प्रदेश सचिव बळीराम गित्ते यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्य पध्दतीने साजरा करण्यात आला. दरम्यान युथ इंटकच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांच्या हस्ते बळीराम गित्ते यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्यक्ष भेटुन संपुर्ण महाराष्ट्रातुन सोशल मिडीया, फोन याद्वारे तसेच राज्यातील इंटकच्या पदाधिकारी यांनी भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.
             शहरातील भगवान बाबा मंदिर जवळील शिवाजीनगर येथे आज रविवार,दि.06 सप्टेंबर रोजी दत्तात्रय गुट्टे यांच्या संपर्क कार्यालय येथे छोट्या खानी युथ इंटकचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांच्या हस्ते बळीराम गित्ते यांच्या वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगदी साधेपणाने वाढदिवस साजरा करून सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय गुट्टे प्रदिप कराड हरिश्चंद्र नागरगोजे ,तपासे ,अरुण सुरवसे एस एस मुंडे,पांडुरंग गित्ते सुरज मुंडे,डी टी सांगळे,अमोल गित्ते,धनराज सुरवसे,के एस शिंदे रावसाहेब मुंडे वसंत गित्ते नामदेव गित्ते लांडगे पाटील ,अनिल गित्ते संतोष घुले गणेश वड्डे महेश गित्ते उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह वीज कामगार व कर्मचारी यांनी त्यांच्यावर दिवसभर अक्षरशः शुभच्छांचा वर्षाव केला. सर्वसामान्यांसाठी तसेच वीज कामगारांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झगडणाऱ्या बळीराम गित्ते यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यभरातुन व बीड जिल्ह्यासह परळी शहरातील सामान्य नागरिक, डॉक्टर्स, वकील, व्यापारी, विविध राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी वीज कामगार व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील व मुळ गाव नंदागौळ मित्र परिवारातर्फेही वाढदिवसानिमित्त  सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रत्यक्ष भेटुन शेकडों हितचिंतकांनी शाल, श्रीफळ, फेटा बांधुन सत्कार केला. तसेच विविध वर्तमान पत्रे, व्हाट्सअ‍ॅप, एसएमएस, मोबाईल, फेसबुक आदींच्या माध्यमातुनही त्यांच्या हजारों हितचिंतकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव पाहुन अक्षरशः भारावुन गेले तसेच शुभेच्छांचा बळीराम गित्ते यांनी स्विकार करुन आपल्याला या शुभेच्छामुळे वीज कामगार व कर्मचारी तसेच सामाजिक  क्षेत्रात काम करण्याची आणखी मोठी प्रेरणा मिळाल्याचे  इंटकचे प्रदेश सचिव बळीराम गित्तेंनी सांगितले

No comments:

Post a comment