तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

श्री.नरेन्द्र कुमार सेठी आचार्य चाणक्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित


(मुंबई प्रतिनिधी)शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या व प्रसिध्द संस्था फन टु लर्न व्दारे संचालित आचार्य चाणक्य शिक्षक पुरस्कार २०२० सोहळा नुकताच ऑनलाइन संपन्न झाला. यावेळी श्री.नरेन्द्र कुमार सेठी यांना यंदाचा आचार्य चाणक्य शिक्षावेद्  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात आंतरिक तळमळीने कार्यरत असलेल्या 650 शिक्षकांना गौरवण्यात आले. तसेच या सर्व सम्मानित शिक्षकांची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये करण्यात आली.श्री.नरेन्द्र कुमार सेठी  लिटिल स्टार इंग्लिश हाई स्कूल, मुंबई, येथे गेले 21 वर्ष ज्ञानदानाचे अविरत कार्य करीत आहेत.श्री.नरेन्द्र कुमार सेठी यांना आजपर्यंत 'गुरु द्रोणाचार्य पुरस्कार' आणि अनेक सामाजिक संस्थांच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.श्री.नरेन्द्र कुमार सेठी यांचा शैक्षणिक कार्या बरोबरच सामाजिक कार्यातही मोठा सहभाग आहे.  समाज सेवक नरेन्द्र कुमार सेठी रॅचेट वेलफेयर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. 
तसेच मातोश्री आरोग्य ट्रस्ट मध्येही ते स्वयंसेवक म्हणून काम करतात . समाज सेवक नरेन्द्र कुमार सेठी दुर्गम व बाधित भागात वैद्यकीय शिबिर, पुनर्वसन शिबिरांमध्येही काम करतात.तसेच ग्रामीण भागातील वंचितांना शिकवतात.या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सामाजिक संस्थेने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. श्री.नरेन्द्र कुमार सेठी यांनी आचार्य चाणक्य शिक्षावेद् २०२० पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातील लोकांनी आणि सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक , क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा देऊन सामाजिक क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a comment