तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

शिक्षक दिनाच्या औचित्याने 'शिक्षक कृतज्ञता दिन' म्हणून ऊत्साहात साजराफुलचंद भगत/मंगरुळपीर
दि.५ सप्टेंबर "शिक्षक दिन" म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो .या दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले त्यांचा गुणगौरव  सर्वोच्च अशा राष्ट्रीय पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत होत असतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे शिक्षक दिन साजरा करता येत नसल्याने आपण ज्या व्यक्तीला गुरू मानतो त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी "Thank A Teacher"अशी मोहीम राबविल्या जात आहे. त्या अनुषंगाने जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा शेलुबाजार येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मोहनभाऊ राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश बोबडे यांची उपस्थिती लाभली.तर विशेष अतिथी म्हणून संतोष लांभाडे, सुरज हांडे,बसरे ताई लांभाडे ताई आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेलुबाजार केंद्राचे केंद्रप्रमुख गोपनारायण  आवर्जून उपस्थित होते.
           सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन पार पडले. त्यानंतर शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका मांगाडे यांनी प्रास्ताविकातून "Thank A Teacher"या मोहिमेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले."शाळा बंद शिक्षण सुरू"या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा ऊहापोह केला.शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या सहमतीने व एकमताने शेलुबाजार शाळेसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक सिद्धार्थ ठोंबरे  यांचा सामाजिक कार्यकर्ते मोहन राऊत,व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश बोबडे व केंद्रप्रमुख गोपनारायण  या मान्यवरांच्या हस्ते संयुक्तरित्या गुणगौरव तथा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला."शाळा बंद शिक्षण सुरू" या उपक्रमाच्या अनुषंगाने यशोगाथा मांडताना शाळेकडून या काळात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर वृत्तांत दिला. यामध्ये प्रामुख्याने वर्गवार व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण, प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत पाठ्यपुस्तक पोहोचवणे,"शाळा बंद शिक्षण सुरू" या  सदराचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग, सह्याद्री वाहिनीवर सुरू असलेल्या" टिली मिली "या शैक्षणिक कार्यक्रमाचे वेळापत्रक कळविणे, "शिक्षण मित्र" या संकल्पनेतून जागृत पालक आणि माजी विद्यार्थी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, "माझं घरचं,माझी शाळा" या उपक्रमांतर्गत स्वयंअध्ययन व गृहभेटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शंकानिरसन व वैयक्तिक मार्गदर्शन ,घटक निहाय अध्ययन निष्पत्ती वर आधारित 'प्रश्नावली ,वर्कशीटच्या झेरॉक्स वर्गवार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे'. शिक्षकांकडून स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. "एक तास संवादाचा "या उपक्रमांतर्गत स्मार्टफोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फोन करून संवाद साधणे व शंका निरसन करणे. मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी 'शाळेत शिक्षक उपलब्ध 'असणे यासारख्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल माहिती दिली. शिक्षक दिनाच्या या विशेष कार्यक्रमाचं संचालन जाधव यांनी केले. कार्यक्रमाला गायकवाड ,गिरी , खैरे ,कोकरे ,खांबलकर ,भाकरे तसेच शापोआ चे सर्व मदतनीस उपस्थित होते. मान्यवरांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन करत असलेल्या कामाबद्दल सर्वांचे भरभरून कौतुकही केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment