तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

मांडगे यांनी स्वीकारले आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याचे पालकत्व

 शहरातील सेवासदन येथील विद्यार्थी

 हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली शहरात गेल्या तीन वर्षापासून सतत परिश्रमातून उभारण्यात आलेल्या सेवासदन येथील वस्तीगृहातील विद्यार्थ्याचे पालकत्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी स्वीकारले आहे
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सोय व्हावी व त्यांनी समाजात पुढे यावे यासाठी तीन वर्षापासून शहरातील विवेकानंद नगर येथे सेवासदन ची उभारणी दिव्यांग शिक्षिका मीरा कदम यांनी केली आहे जिल्ह्यात झालेल्या आत्महत्या बघता हे पाऊल कदम यांनी उचलले आहे दरवर्षी या ठिकाणी 30 ते 40 आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत आजकालच्या महागायक युगात विद्यार्थ्यांना सांभाळणे त्यांचे पालन पोषण करणे ही तारेवरची कसरत असताना देखील धनराज कदम व दिव्यांग शिक्षिका मीरा कदम ह्या कसरत करीत आहेत शिवसेनेचे बीड नांदेड हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी एका विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून सेवासदन ला हातभार लावला आहे यांच्या या कार्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व या कार्यामुळे इतर समाजातील थोर व्यक्तींनी सेवासदन साठी हात पुढे करावेत असे बोलताना मांडगे यांनी व्यक्त केले आहे विद्यार्थ्यांच्या संगोपनासाठी मांडगे यांनी एकवीस हजार रुपयाची प्रथम मदत म्हणून सेवासदन ला सुपूर्त केली आहे यावेळी परमेश्वर मांडगे लिंबाजी पठाडे धनराज कदम मीरा कदम आदींची उपस्थिती होती


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो 
नंबर 8007689280

No comments:

Post a comment