तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा बोरखेडी परिसरातील सोयाबीन पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या परमेश्वर इंगोले यांची मागणी

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिवरखेडा साखरा बोरखेडि या सह या भागातील तातडीने पंचनामे करुन मदत आर्थिक नुकसान भरपाई द्या अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी आज दि 09/09/2020 रोजी मा .जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन जिल्हा अधिकारी साहेबांनी लवकरात लवकर पंचनामे करण्यातचे आदेश द्यावे अशी मागणी परमेश्वर इंगोले यांनी आज एका निवेदनाद्वारे केली आहे 
सेनगाव तालुक्यातील साखरा हत्ता कापडशिंगि हिवरखेडा बोरखेडि केलसूला धोतरा घोरदरी खडकी  व परिसरातील आदी गावातील सोयाबीनचे पीक जास्त प्रमाणान पाऊस जाल्या मुळे सोयाबीन हे पीक  वाया गेले आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीकाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून होत आहें 
       सेनगाव   तालुक्यात यावर्षी खरिपाच्या हंगामाला जून पासून सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी पेरणीला जोरदार सुरुवात केली सोयाबीनच्या पीकाचे साखरा हिवरखेडा परिसरात पाऊस  जास्त प्रमाणान पाऊस पडल्या मुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच  दरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर बुरशीजन्य संसर्ग, खोडकिडीचा प्रादुर्भाव पाने खाणारी अळी यामुळे फुले, पात्या,शेंगा 100% गळल्या असून झाड उभे आहे. शेतामध्ये सोयाबीन चे झाड पिवळे पडले आहेत आणि जागीच वाळून जात आहेत 
      सोयबीनच्या बोगस बियाणेमुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यावर संकट ओढावले परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या संकटाला तोंड देत न डगमता शेतकऱ्यांनी पेरणी केली. पीकाला आवश्यक असणारा पाऊस वेळेवर कमी प्रमाणात पडला आहेlllll आहेत.थोड्या थोड्या पावसावर सोयाबीन ही वाढही मोठ्या जोमात झाली. कधी नव्हे ते या वर्षी बहरलेले सोयबीनचे नुकसान झाले आहे. आधीच कमी पाऊस त्यातच मागील  काही आठ दिवस तालुक्यात संततधार भिज पावसाने सोयबीनसह उडीद, मुगाला रोगराई व किडीने ग्रासल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सोयबीनची केवळ वाढच झाली आहे. फलधारणा मात्र झाली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना जबर बसला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत असून दुष्काळाच्या झळा सोसत आहे. दर वर्षी होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे एकरी एक  किण्टल  सोयाबीन होणार नाही.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहें 
प्रतिक्रिया 
माज्या शेतात दोन एकर मधील सोयाबीन पूर्ण पणे पिवळी पडली आहें आणि पूर्ण पणे वाळून जात आहें जास्त पावसामुळे माज्या शेतातील पूर्ण सोयाबीन खराब जाली आहें जिथे दहा पोते सोयाबीन होते तेथे या वर्षी एक पोते देखिल सोयाबीन होने अवघड आहें मा .जिल्हा अधिकारी साहेब यांनी नुकसान जालेल्य पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत मात्र अद्याप हि आमच्या शेतात कोणताही अधिकारी पंचनामा करण्यासाठी आला नाही प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी 

संदीप सुभाषराव राऊत .मु .साखरा .ता .सेनगाव .जिल्हा हिंगोली
प्रतिक्रिया 
माज्या शेतात मि दोन एकर मधील सोयाबीन पूर्ण पिवळी पडली आहे आत्ता पर्यंत मि पन्नास हजार रुपये खर्च केला आहे आत्ता दहा हजाराचे देखिल उत्पन्न होने शक्य नाही तरी प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी 

शेतकरी दत्तराव निरगुडे .मु .हिवरखेडा  ता .सेनगाव .जिल्हा हिंगोली

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment