तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

शहरातील सार्वजनिक व घरातील श्री चे न.प.च्या वतिने विसर्जन


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
 परळी शहरात स्थापन करण्यात आलेल्या सोळा सार्वजनिक व घरोघरी स्थापन केलेल्या श्री गणेशाचे आज दि.1 सप्टेंबर रोजी परळी न.प.च्या वतिने विसर्जन करण्यात आले.यासाठी प्रत्येक प्रभागात एक असे एकुण सोळा गणेश मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते.
 मागील दहा दिवसापासुन कोरोना मुळे साधेपणाने साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज दि.1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी झाली.जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार परळी न.प.च्या वतिने थर्मल कॉलनी मुख्य गेट,संत नरहरी महाराज मंदिर,विद्युत डी.पी.जवळ,कृष्णाबाई देशमुख शाळेसमोर, गणेश मंदिर जवळ गणेशपार,सावता माळी मंदिर,हनुमान मंदिर जवळ पद्मावती गल्ली,सुभाष चौक,एस.के.हाॕटेल,बेग टाइल्स उड्डाणपुलाशेजारी,शिवाजी चौक, गजानन महाराज मंदिर,हनुमान मंदिर मोंढा मार्केट,जगमित्र नागा मंदिर,देशमुखपार, हनुमान नगर चौक चांदापूर रोड,पंचायत समिती नजीक अशा सोळा केंद्रावरून गणेश मुर्ती संकलित करण्यात आल्या.तर न.प.कार्यालयात बसविण्यात आलेल्या गणपती चे विसर्जन नायब तहसिलदार बाबुराव रूपनर,स्वच्छता सभापती  किशोर पारधे, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,तलाठी  राजुरे,शंकर साळवे , दिलीप रोडे,दिलीप गुट्टे व नगर परिषद कर्मचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

No comments:

Post a comment